Acts 23:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तुम्ही आता असे करा: तुम्ही (मुख्य याजक) व धर्मसभेने अशा प्रकारचा विनंति अर्ज सरदाराला लिहा की, पौलासंबंधी अधिक बारकाईने चौकशी करायची असल्याने पौलाला आमच्याकडे घेऊन यावे. तो येथे येण्याअगोदरच आम्ही त्याला ठार मारण्याच्या तयारीत असू.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आता त्याच्याविषयी बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सरदाराला पटवून द्यावे, म्हणजे पौल जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार असू.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता, त्याच्याविषयी आणखी काही विचारपूस बारकाईने करावयाची आहे, या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सेनापतीला सुचवावे. तो येथे येण्यापूर्वी त्याला ठार करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”