Acts 23:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मुलगा म्हणाला, “यहूदी लोकांनी असे ठरविले आहे की, पौलाला घेऊन तुम्हांला उद्या धर्मसभेपुढे यायला सांगायचे, व अशा बहाण्याने त्याला आणायचे की, जणू काय त्यांना पौलाची अधिक बारकाईने चौकाशी करायची आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो म्हणाला, “यहुदी अधिकाऱ्यांनी असे संगनमत केले आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.