Acts 23:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आपण त्यांचे ऐकू नका कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला ठार मारीपर्यंत ते खाणार पिणार नाहीत. आता ते तयार होऊन आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”