Acts 23:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या मनुष्याला यहूदी लोकांनी धरले होते. ते त्याला ठार मारण्याच्या बेतात होते. पण तेवढ्यात माझ्या शिपायांसह मी तेथे गेलो व त्याला सोडविले. तो रोमी नागारिक आहे हे समजल्यावरुन मी त्याची सुटका केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या मनुष्याला यहुदी लोकांनी धरले होते आणि ते त्याचा घात करणार होते, इतक्यात हा रोमन आहे, असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन त्याला सोडवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या मनुष्याला यहूदी लोकांनी पकडले होते व ते त्याला ठार मारणार होते, तेव्हा तो रोमी नागरिक आहे हे समजल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी मी सैनिक पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले.