Acts 23:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नावरुन त्यांनी त्याला दोषी ठरविले हे मला दिसून आले. पण त्याच्यावर असा कोणताही आरोप नव्हता, ज्याची शिक्षा मरणदंड किंवा तुरुंगवास होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टीसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला आढळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला लवकरच समजून आले की त्यांच्यातील वाद हा नियमांविषयी होता आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवास अथवा मरणाची शिक्षा देता येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.