Acts 23:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा या मनुष्याला जिवे मारण्याचा कट रचला गेल्याचे मला कळले तेव्हा मी त्याला ताबडतोब आपल्याकडे पाठविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या माणसाविरुद्ध कट रचण्यात आला आहे, अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.”