Acts 23:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे मोठी गडबड उडाली. जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही, कदाचित आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर खरोखर बोलला असेल!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? [आपण देवाशी भांडू नये].”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?”