Acts 24:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले, तेव्हा पौल म्हणाला, “फेलिक्स महाराज, बरीच वर्षे या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणा समोर स्वत:चा बचाव करायला आनंद वाटत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
राज्यपालांनी बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात, हे मला ठाऊक आहे म्हणून मी माझ्यासंबंधीच्या गोष्टींचे आनंदाने समर्थन करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर पौलाने उत्तर दिले: “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राज्यपालाने त्याला बोलण्यास खुणावले, पौलाने उत्तर दिले: “महाराज, आपण अनेक वर्षे या देशात न्यायाधीश म्हणून आहात; त्यामुळेच मी आनंदाने माझे बचावाचे भाषण आपणापुढे करीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.