Acts 25:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना. तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्याला यरुशलेम येथे नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्याला विचारले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याची चौकशी कशी चालवावी, हे मला समजेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, ‘यरुशलेम येथे जाऊन ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, ‘यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा प्रकारच्या प्रकरणात कसा काय निर्णय द्यावा याविषयी मी गोंधळात पडलो. तेव्हा मी पौलाला या आरोपांची चौकशी यरुशलेममध्ये व्हावी यास त्याची मान्यता आहे का, असे विचारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना, तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्यास यरूशलेम शहरास नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले.