Acts 25:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा पौल तेथे हजर झाला, तेव्हा यरुशलेमहून तेथे आलेले यहूदी लोकही पौलाच्या सभोवती उभे राहिले, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ गंभीर आरोप ठेवले, परंतु ते आरोप यहूदी लोक सिद्ध करु शकले नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आल्यावर यरूशलेम शहराहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.