Acts 26:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौल म्हणाला, “अल्पावधी किंवा दीर्घकाळ, कसेही असो केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी माझ्या बेड्यांखेरीज इतर बाबतीत माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पौल म्हणाला, “थोडके किंवा फार, कसेही असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधनांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.”