Acts 26:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात. आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते पहिल्यापासून मला ओळखतात म्हणून त्यांची इच्छा असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कट्टरपंथाप्रमाणे मी परुशी होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मला बर्‍याच काळापासून ओळखतात आणि त्यांना मान्य असेल तर माझ्याबद्दल साक्षही देऊ शकतील, की आपल्या धर्माच्या पंथाबाबतीत मी नेहमीच कट्टर परूशी म्हणून जीवन जगलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.