Acts 27:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बरेच दिवस आम्हांला सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या सर्व आशा सोडून दिल्या. आम्ही मरणार असे आम्हांला वाटू लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत, तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळे शेवटी आम्ही वाचण्याची आशा हळूहळू सोडून दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.