Acts 27:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बराच काळपर्यंत लोकांनी अन्नपाणी घेतले नव्हते. मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरुन मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता. म्हणजे हा त्रास व ही हानि तुम्हांला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंति आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांना पुष्कळ दिवस उपवास घडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, खरेच, तुम्ही माझे ऐकावयाला हवे होते. क्रेत बेटावरून निघावयाचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.”