Acts 27:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले. तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले, तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसवले; तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्या लाटांनी तुकडे तुकडे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.