Acts 27:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यापुढे आमचे जहाज क्रेतच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणींतून सुरक्षित बंदर येथे पोहोंचले, तेथे जवळच लसया नगर होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर या ठिकाणी आलो. त्याच्याजवळ लसया नगर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो; त्याच्याजवळ लसया नगर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुढे वादळी वार्यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.