Acts 3:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे म्हणाला, ‘प्रभु तुमचा देव तुम्हांला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वत:च्या (यहूदी लोकांच्या) मधूनच देईल. तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हांला सांगेल ते सारे तुम्ही पाळा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशेनेही म्हटले आहे, प्रभू तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून पाठवील, तो जे काही तुम्हांला सांगेल, त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेनेही म्हटलेच आहे, ‘प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’