Acts 4:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते लोकांबरोबर बोलत असता काही याजक, मंदिराच्या रक्षकांचा अधिकारी व सदूकी हे तेथे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना याजकगण, मंदिराच्या रक्षकांचा प्रमुख आणि काही सदूकी लोक त्यांच्याकडे आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक परमेश्वराच्या भवनाची रखवाली करणाऱ्यांच्या सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.