Acts 4:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यहूदी पुढान्यांनी पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की, येशूच्या नावाने काही करु नका व शिकवू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, “येशूच्या नावाने मुळीच बोलू नका अथवा शिकवूही नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी पेत्र व योहानला बोलावून आज्ञा केली की तुम्ही येशूच्या नावाने मुळीच बोलू नका व शिकवूही नका.