Acts 5:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मरण पावलेली; अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले.