Acts 5:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इतके की, लोक रुग्णांना रस्त्यावर आणून खाटांवर आणि चटयांवर ठेवीत, ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इतके की लोक दुखणेकर्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवत; ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.