Acts 5:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“ह्या नावाने शिकवण देऊ नका, असे आम्ही तुम्हांला बजावले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“या नावाने शिक्षण देऊ नका, असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही, तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”