Acts 5:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.