Acts 5:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण काही दिवसांपूर्वी थुदासने पुढे येऊन ‘मी कोणीतरी आहे’ असा दावा केला. त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते दिसेनासे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली; तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण काही दिवसांपूर्वी, थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे, असे म्हणू लागला, त्यास सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्यास मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.