Acts 6:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.