Acts 7:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याने त्यांचे लहान मुलगे जगू नयेत म्हणून त्यांना टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. अशा प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.