Acts 7:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्‍याला मारून’ त्याचा सूड उगवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला: