Acts 7:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दुसर्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’