Acts 7:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय ‘पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.