Acts 7:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून तो खासद्यांच्या देशातून निघून हारान येथे जाऊन राहिला. त्याचा पिता निधन पावल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मृत झाल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.