Acts 7:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्या राष्ट्राचा मी न्याय करीन’, असे देवाने सांगितले आणि ‘त्यानंतर ते तेथून बाहेर पडतील व ह्या ठिकाणी माझी उपासना करतील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले.