Acts 7:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर देवाने त्याला सुंतेचा विधी कराराचे चिन्ह म्हणून नेमून दिला, हा करार झाल्यानंतर अब्राहामला इसहाक झाला. त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली. मग इसहाकने याकोब ह्या त्याच्या मुलाची सुंता केली व याकोबने त्याच्या बारा पुत्रांची - जे कुलपती झाले - त्यांची सुंता केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.