Acts 8:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील रिव्रस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शौलाला तर स्तेफनचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेम येथल्या मंडळींचा फार छळ झाला. प्रेषितांखेरीज इतर सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदीया व शोमरोन ह्या प्रदेशांत पांगापांग झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले.