Acts 8:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन जाहीर केल्यावर ते यरुशलेम नगरास परत आले, येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांत शुभवर्तमान घोषित केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर पेत्र व योहान ह्यांनी आपली साक्ष लोकांस देऊन, “प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरूशलेम शहरास परत आले, परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.”