Acts 8:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा तो अधिकारी म्हणाला, “पाहा, इथे तर पाणी आहे. मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते दोघे प्रवास करीत असताना, एका तळ्याजवळ आले; तेव्हा अधिकारी म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे; माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?”