Acts 8:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फिलिपने म्हटले, “जर आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरत असाल, तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असा मी विश्वास धरतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.”)2
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.