Acts 8:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले.