Acts 9:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु प्रभू हनन्याला म्हणाले, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएली लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु प्रभू म्हणाला, “जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.