Acts 9:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलाने त्याला दिमिष्क येथील सभास्थानातील यहूदी लोकांना पत्र लिहिण्यास सांगितले. शौलाला प्रमुख याजकाकडून दिमिष्क येथील रिव्रस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अधिकार पाहिजे होता. जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, सापडले असते तर त्याने त्यांना अटक करुन यरुशलेमला आणले असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.