Acts 9:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यापो येथीला अनुयायांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विंनति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोद हे गाव यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे, असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे यायला उशीर करू नकोस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोद योप्पाच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.”