Amos 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात, “अम्मोनच्या तीन नाही तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.