Amos 1:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; आणि आवेन खोर्यातील राजा आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” याहवेह असे म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” असे परमेश्वर म्हणतो.