Amos 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “सारेच्या पुष्कळ अपराधांबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्र आपल्या ताब्यात घेऊन लोकांना गुलाम करून अदोमला पाठविले. त्यांच्या भावांबरोबर (इस्राएलबरोबर) केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, “सोराचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, “सोराच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही. कारण त्यांनी संपूर्ण लोकांस अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावांबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.