Amos 2:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते गरीब लोकांजवळून कपडे घेतात आणि वेदीजवळ बसून पूजा करताना त्या कपड्यावरच बसतात. ते गरिबांना पैसे कर्जाऊ देतात आणि त्याबदल्यात त्यांचे कपडे गहाण म्हणून ठेवून घेतात. ते लोकांना दंड देण्यास भाग पाडतात आणि त्या पैशातून स्वत:साठी मद्य विकत घेतात व त्यांच्या दैवतांच्या देवळात बसून ते पितात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक वेदीजवळ गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात आणि आपल्या दैवतांच्या घरात दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.