Amos 4:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वराने आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, “पाहा, असे दिवस तुम्हांला येत आहेत की तुम्हांला आकड्यांनी ओढून नेतील; शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे: “खचितच अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.