Amos 4:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“उष्णता व रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा व द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडन केले; तुमच्या बागा, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतून झाडे, कुरतडणार्‍या टोळांनी खाऊन टाकली; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा, व द्राक्षमळ्यांचा, व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले. तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.