Amos 5:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही गरिबांना तुडवीता, आणि त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली, पण त्यामध्ये तुम्ही रहाणार नाही. तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही.