Amos 6:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रेत घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी लपले असेल तर त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी एखादे प्रेत आहे का?” तो माणूस म्हणेल, “नाही......” मग त्या माणसाचा नातेवाईक म्हणेल, “शू! आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी त्याची हाडे घरातून बाहेर नेण्यास येईल, तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणार्‍याला विचारील की, “आणखी कोण तुझ्याबरोबर आहे काय?” तो म्हणेल, “नाही”; तेव्हा हा म्हणेल, “गप्प राहा! परमेश्वराचा नामोच्चार करायचा नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”