Amos 6:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.