Amos 6:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.’ सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “पाहा, हे इस्राएलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन; ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हांला पिडतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात, “हे इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध एक राष्ट्र उठवेन, लेबो हमाथपासून अराबाच्या ओहोळापर्यंत ते तुझ्यावर जुलूम करेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन, ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दु:ख देईल.” सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.